
-अखिल भारतीय माळी महासंघ द्वारा कार्यक्रम यशस्वी
-गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा केला सत्कार आणि गौरव
अकोला : अखिल भारतीय माळी महासंघ द्वारा आयोजित अकोला जिल्हा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन आज आज दिनांक 24 रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे करण्यात आले यामध्ये अकोला जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता प्राप्त माळी समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कौतुक करण्यात आले असून समाजातील विद्यार्थ्यांना विशिष्ट दिशा प्राप्त व्हावे याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
अखिल भारतीय माळी महासंघ द्वारा आयोजित अकोला जिल्हा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकरराव गणगणे तुकाराम बिरकड लक्ष्मणराव तायडे जयवंतराव मसने बळीराम सिरस्कार संतोष जी रहाटे डॉ संतोष हुसे सुभाष सातव अर्चनाताई मसने आनंदराव बगाडे अनुराधाताई नावकार विजयाताई उमप गजाननराव तायडे सुभाष पवार आदींची उपस्थिती होती, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा या कार्यक्रमा मध्ये अकोला जिल्ह्यातील माळी समाजातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि आल्या आयुष्यामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी तसेच समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या करिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम गेल्या १६ वर्षांपासून यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ अथक प्रयत्न करत आहे. या मध्ये शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त तब्बल २०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय धावपटू सौ माधुरी प्रकाश दाते, ट्रायबल स्पोर्ट अँड एजुकेशन सोसायटी नंदुरबार द्वारा सातपुडा गौरव राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा डॉ नितीन वासुदेवराव देऊळकार आणि आधार फॉर एनिमल्स फाऊंडेशन च्या कु काजळ विलास राऊत याचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शिका म्हणून सौ कमलाबाई तायडे, सौ सुरेखाताई गणगणे, सौ रेणुका ताई सिरस्कार सौ राधाताई बिरकडं श्रीमती सुमित्रा निखाडे लाभले असून कार्यक्रमाचे संयोजक गणेश म्हैसने आणि सौ कल्पना तायडे यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड प्रकाश दाते प्रा डॉ नितीन देऊळकार श्रीकृष्ण बिडकर सौ भारतीताई शेंडे तथा अखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्हा व सदस्य यांनी अथक प्रयत्न केले.