शुक्रवारी दूपारी १ दहावीचा निकाल ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

मुंबई,
दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. या परीक्षेस १६,३८,९६४ विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. शुक्रवारी दूपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. या बातमीत पुढे तीन लिंक दिल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक, टच केल्यावर थेट तुम्ही निकालाच्या वेबसाईटवर जावू शकाल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार शुक्रवार दि. १७ जून,२०२२ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
तसेच, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. सर्व विद्याथ्र्यांना मनापासून शुभेच्छा..!
1. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
2. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
३. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
स्टेप १ : वरील कुठल्याही एका संकेत स्थळावर क्लिक करा.
स्टेप २ : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप ३ : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप ४ : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप ५ : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप ६ : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
उद्या वाढणार पेढ्यांची विक्री
दरम्यान, दहावीचा निकाल पाहता उद्या पेढ्यांची विक्री वाढणार असून भेसळ युक्त पेढे टाळण्यासाठी आजच पेढे विकत घेण्याची गरज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुलींनीच बाजी मारली असून यंदा बारावी मुलींच अव्वल ठरल्या होत्या. यंदा दहावीचा निकाल तसाच लागणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, सिटी न्यूज सुपरफास्ट शनिवार च्या अंकात १० वीत ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्याथ्र्यांचे फोटो प्रकाशित करणार आहे. आपल्या शाळांना विंâवा आपण स्वतः फोटो गुणपत्रिकांसह मेल करु शकता. त्यासाठी मेल आय डी आहे. citynewss80@gmail.com

दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे १,४४९,६६० विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत. मीडिया रिपोट्र्सनुसार, यावर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल १५ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, याबाबत बोर्डानं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. तर गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं.