खळबळजनक….अकोल्यात इतके कोरोना रुग्ण कुठले

अकोला आरोग्य ब्रेकिंग

कोविडःआरटीपीसीआरमध्ये 27 पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज

अकोला दि.23

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 184 अहवाल प्राप्त झाले. त्यात २७ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान, अकोल्यातील पोलिस प्रशिक्षण विद्यालयातील यातील अनेक रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. २५ रुग्ण या ठिकाणचे असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांमध्ये काही पोलिस प्रशिक्षणार्थी आणि काही तिथले कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 27 व खाजगी शुन्य) 27+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 27.

आरटीपीसीआर ‘27’

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 25 जण तर मुर्तिजापूर येथील दोन जणांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तीन जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात तीन रुणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘44’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65252(49229+15039+984)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 44 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण असून त्यातील 10 रुग्णालयात दाखल तर अन्य 34 रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *