‘ त्या ‘ मेलेल्या वाघाची चौकशी करा – राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींची मागणी

अकोला ब्रेकिंग

उपवनसंररक्षक यांना लिहिलेले पत्र

उपवनसंररक्षक यांना लिहिलेले पत्र

दि २८/०६/०२२ रोजी मोझरी खुर्द, ता. बार्शिटाकळी येथे पट्टेदार वाघाचा मृत्यु झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका पत्राद्वारे केली आहे. मोझरी खुर्द ता जि. अकोला येथे पट्टेदार वाघाचा मृतदेह सापडला असून सदर घटनेची सखोल चौकशी करावी. अकोला जिल्हात अनेक ठिकाणी पट्टेदार वाघाचा वावर असल्याचा बातम्या वृतपत्रात येत होत्या. त्या अनुषंगाने वाघांच्या संवर्धनासाठी तसेच ग्रामस्थानच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने काय पाऊले उचलली आहे. त्याचा अहवाल आमदारांकडे सादर करण्यात यावा. तसेच हा विषय अत्यंत गंभीर असून तात्काळ विशेष बैठकीचे आयोजन करावे. अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *