महाराष्ट्रातील सत्तानाट्यात आज काय घडलं?

ताज्या घड्यामोडी

परत या उद्धव ठाकरेंचं आवाहन

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

एकनाथ शिंदे यांचा प्रतिसवाल

एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

​केसरकराचं आदित्य ठाकरेंना आवाहन

​केसरकराचं आदित्य ठाकरेंना आवाहनआदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्त्व उभं करावं, संजय राऊतांसारखं त्यांनी बोलू नये, ती भाषा त्यांच्या तोंडात शोभत नाही, आम्ही त्यांच्याकडे एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून पाहातो, उद्याचा महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहातो, आमचं प्रेम, आशीर्वाद त्यांच्यासोबत, त्यांनी चांगलं काम करावं, असं दीपक केसरकर म्हणाले. तर, मविआतून बाहेर पडण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा यासाठी आजचा शेवटाचा दिवस असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

संजय राऊतांचा एकनाथ शिंदेना इशारा

अलिबागमध्ये सध्या शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे आमदार नाहीत ते पुढील वेळी असतील, असं संजय राऊत म्हणाले. अलिबागमध्ये अनेकांच्या नावापुढं शेठ लावलं जातं. तसंच दादा देखील लावलं जातं. ठाण्याच्या भाईंना इकडचे दादा भारी पडतील,असा इशारा संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *