व्हेज, नॉनव्हेज, पिझ्झा प्रेमींसाठी खास
मॅड ओव्हर चिकन आता अकोल्यात
अकोलेकरांची स्वादप्रियता लक्षात घेता आता अकोलेकरांसाठी अमेरिकन रेस्टॉरेंटचा स्वाद उपलब्ध झालेला आहे.एम ओ सी चे म्हणजेच मॅडओव्हर चिकनचे द अमेरिकन रेस्टॉरेंट अॅन्ड पिझ्झा लेनचे व्हेज व नॉनव्हेज पिझ्झा, बर्गरसह विविध स्वादिष्ट व चविष्ट मेनू अकोलेकरांसाठी उपलब्ध झालेले आहेत. स्थानिक रणपिसे नगर चौक येथे फस्र्ट क्राय शोरुमच्या बाजूला रविवार दि. ३ जुलै रोजी एमओसीच्या द अमेरिकन रेस्टॉरेंट अॅन्ड पिझ्झा लेनचे शानदार उद्घाटन झाले. मा.सौ. ऋतुजा देशमुख, मा. श्रेया देशमुख, मा. आदित्य देशमुख, मा. पंकज देशमुख यांच्या हस्ते या रेस्टॉरेंटचे उद्घाटन पार पडले. यावेळी मा.सौ. कल्पनाताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या रेस्टॉरेंटमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज पिझ्झा, बर्गरसह खास चिकन प्रेमींसाठी विविध चविचे व स्वादाचे विविध प्रकारचे मेनू उपलब्ध आहेत. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी अकोल्यातील युवा व स्वाद प्रेमींनी या रेस्टॉरेंटमधील विविध मेनूंचा स्वाद चाखला. पहिल्याच दिवशी या रेस्टॉरेंटमधील चविष्ट मेनुंनी अकोलेकरांची मने जिंकली. या रेस्टॉरेंटमध्ये रेगुलर फ्राइज, लार्ज फ्राइज, चिजी फ्राइज, पेरी पेरी चिकन चिजी फ्राइज, तसेच शेक मध्ये व्हॅनिला शेक,स्ट्रॉबेरी शेक, मँगो शेक, ओरिओ शेक, वॉटरमेलन, वर्जिन मॉजीटो, कोल्ड कॉफी, छोटू पिझ्झा वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा अकोलेकरांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये नॉन व्हेज सिंगल्स, नॉन व्हेज डबल्स, पास्ता, ब्रेड, व्हेज सिंगल्स, व्हेज डबल्स, व्हेज बर्गर, नॉन व्हेज बर्गर मध्ये विविध प्रकारचे बर्गर्स याठिकाणी उपलब्ध आहेत. यासर्व मेनुंचा अकोलेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.