
बाळापुर : बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरूण परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पासून सतत चार तास पावसाने झोडपल्याने येथील नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला यामुळे नाले व मोर्णा नदी काटचे शेकडे एकर मधील पिके पाण्याखाली आल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीची संकट उभे ठाकले आहे. रोहिणी नक्षत्र कोरडेल गेल्यानंतर पेरणीला उशिरा होऊ नाही .म्हणून येथील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रा मध्ये पडलेल्या आत्तेल्प पावसावर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कपाशी ज्वारी सोयाबीन मुंग उडिद तिळ या पिकांची पेरणी केली परंतु काल आलेल्या जोरदार पावसामुळे नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नाल्याकाठच्या शेकडो एकर जमिनीतील पिके पाण्याखाली दबल्याने नष्ट झाले, शेतकरीआर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची शेतीतात्काळ सर्वे करून दोबारा पेरणीसाठीआर्थिक मदत देण्यात यावीअशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुधवारी आलेल्या जोरदार पावसामुळे नाल्याकाटची पिके संपूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना दोबार पेरण्याची संकट आली असूनशासनाने त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बी बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी हातरून येथील समाजसेवक काजी मेहंदी हसन यांनी केली आहे