प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज
अकोला : पावसाळा सुरू झाला आहे, दरम्यान अकोला बसस्थानकावर प्रवाश्यांना बस वेळेवर येत नसल्याने बस स्थानकावर बसून राहावे लागत आहे. एकीकडे रस्त्यांची दुरावस्था आणि त्यामुळे एसटी उशिरा येत असल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील लालपरी सुरू झाली खरी परंतु या लालपरीला चालवणारे ही लालपरी कधी बसस्थानकावर वेळेवर आणतील या प्रतीक्षेत प्रवासी बसलेले दिसतात. अकोला बस स्थानकावर ठरलेल्या वेळेत कोणतीही बस येत नसल्याने प्रवाश्यांना या ठिकाणी तासंतास बसून राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाश्यांना या बाबीचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाश्यांसाठी उत्तम सेवा ही लालपरी नेहमीच देत असते. परंतु एक एक तास ही लालपरी जेव्हा वेळेवर येत नाही तेव्हा प्रवाश्यांचा जीव मेटाकुटीस येतो. या कडे प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.