धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

Entertainment

धर्मवीर या मराठी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा आज सायन-पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला. मंगेश देसाई आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात होते. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नसून कारचे मात्र मोठं नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार धर्मवीर चित्रपटाचे निर्मार्ते तसेच अभिनेते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला आहे. ते आपल्या कुटुंबियांसोबत कर्जलतला जात होते. यावेळी समोरच्या कारने अचानक ब्रेक मारल्यामुळे देसाई यांची कार त्या कारवर धडकली. यामध्ये देसाई तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही दुखपात झाली नसून ते सर्व सुखरुप आहेत. तशी माहिती खुद्द मंगेश देसाई यांनी दिली आहे. सायन-पनवेल महामार्गावर हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *