या चित्रपटाचे नाव आहे ‘शाकुंतलम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगु सोबतच तो हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही येणार आहे. तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘शाकुंतलम’ या चित्रपटात अल्लू अर्जुनची पाच वर्षांची मुलगी अल्लू अऱ्हादेखील आहे. अल्लू अऱ्हा या चित्रपटात राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा राजकुमार भरत यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे.गेल्या काही वर्षात अनेक स्टार किड्सनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारा अभिनेता अल्लू अर्जुन याची लेकही मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती एका वेगळ्या भूमिकेतून प्रवक्षकांसमोर येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली असून मोठ्या स्टारकास्ट बरोबर ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.