“सगळं कायेदशीर, पण हे क्रिकेट नव्हे,” ‘बर्मी आर्मी’ची टीम इंडियावर टीका; भारतीयांनीही दिलं जशास तसं उत्तर

Sport

भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेतील अंतिम सामन्याची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. पूर्वी खेळभावनेविरोधी म्हटल्या जाणाऱ्या आणि आता कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेल्या मंकडिंगच्या मदतीने भारताच्या दिप्ती शर्माने इंग्लंडच्या खेळाडूला बाद करून भारताला सामना जिंकून दिला. दिप्ती शर्माने मिळवलेल्या या विकेटची सध्या जगभरात चर्चा होत आहे. भारताने हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना पाठिंबा देणाऱ्या ‘बर्मी आर्मी’ या ग्रुपनेदेखील दिप्ती शर्माने जे केलं, त्याला क्रिकेट म्हणत नाहीत, अशी भावना व्यक्त केली आहे. बर्मी आर्मीच्या मतानंतर भारतीय क्रिकेटचाहतेही चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी बर्मी आर्मीला जशास तसे उत्तर दिले आहे.भारताने सामना जिंकल्यानंतर बर्मी आर्मीने एक ट्वीट केलं. दिप्तीने ज्या पद्धतीने इंग्लंडच्या खेळाडूला बाद केले ते नियमांना धरूनच आहे. पण तिने जे केले ते खरे क्रिकेट नाही. खेळ संपवण्याची ही एक चुकीची पद्धत आहे, असे बर्मी आर्मीने ट्वीट केले. त्यानंतर भारतीयांनी बर्मी आर्मी ग्रुपला जशास तसे उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *