
प्राचिन विठ्ठल-रुख्माई मंदीरात केली महापूजा
अनेक वारकऱ्यांनी घेतले विठूमाऊलीचे दर्शन
आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी संपूर्ण शहरात व जिल्ह्यात अत्यंत भक्तीभावाचे वातावरण पहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या निर्बंधांमुळे आषाढी एकादशीचा उत्सव वारकऱ्यांना साजरा करता आला नव्हता. या वर्षी मात्र अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात हा उत्सव
साजरा होत असल्याचे दिसते
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर… टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती….. पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर… या अभंगाप्रमाणे अकोला शहरात प्राचिन विठ्ठल-रुख्माई मंदीरात पहाटे महापूजा व आरती गजर ऐकायला येत होता ,प्राचीन विठ्ठल मंदीराला जणू काही पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत होते.मंदिराच्या अवतीभवती टाळ मृदंगाच्या गजराने वारकरी मंत्रमुग्ध झाल्याचे या ठिकाणी दिसत होते. पंढरपूरला जाऊन विठूमाऊलीचे दर्शन होऊ शकत नसल्याने या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली, मंदीर परिसरात भाविकांच्या सोईसाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला तसेच या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे दिसले. शहरातील उमरी, रामनगर,डाबकी मार्ग, जुने शहर भागातील प्रसिद्ध विठ्ठल मंदीरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंदीरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने महापूजा, महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, जे भाविक पंढरपूरला जावू शकले नाहीत त्यांनी स्थानिक मंदीरांमध्ये विठ्ठल-रुख्माईचे दर्शन घेतले आहे.