कर्मचारी आणि इतर नागरिकांचा जीव धोक्यात
प्रशासनाने प्रस्तावाला दाखवली केराची टोपली
अकोला : जिल्हा परिषदेच्या सुमारे 54 वर्षे जुन्या झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार आहे याकरिता नागपूरचे विश्वेश्वर राष्ट्रीय औद्योगिक संस्थाला पत्र पाठवून ऑडिट करण्याची विनंती करण्यात आली आहे मात्र तोपर्यंत कर्मचाऱ्यांना जीव मुठीत ठेवूनच काम करावं लागणार
जिल्हा परिषदेत 14 पेक्षा जास्त विभाग असून 400 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी आहेत तसेच पदाधिकारी सदस्य कंत्राटदार व शासकीय योजनेबाबत माहिती घेणे आणि अन्य कामासाठी येणाऱ्या ची संख्या कमी नसते मात्र जिल्हा परिषद ची इमारत मजबूत नसून ती धोकादायक झालेली आहे नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव शासनाला सादरही झाला आहे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शासनाकडे पाठपुरावाही केला होता दरम्यान काळात इमारतीच्या मुद्द्यावर कर्मचारी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्र पाठवून उपाययोजना करण्याची मागणी केली होती संबंधित पत्राची जिल्हा प्रशासनाला व जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आली परंतु या पत्राच्या विषयाकडे जिल्हा प्रशासनाने तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे
दिसून येत आहे