पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झारखंडच्या देवघर इथे, 16,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी झारखंडचे राज्यपाल, रमेश बैस, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बाबा बैद्यनाथ यांच्या कृपेने, आज 16,000 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आज इथे करण्यात आली, असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. या सर्व प्रकल्पांमुळे झारखंडमध्ये दळणवळणाच्या आधुनिक सोयीसुविधा, ऊर्जा, आरोग्य, श्रद्धास्थाने आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल असेही पंतप्रधान म्हणाले.