शिक्षक शिकवत असताना अचानक बेशुद्ध पडला; दुसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा वर्गातच मृत्यू

देश – विदेश

नवी दिल्लीः एका शाळकरी मुलाचा वर्गातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील रोहिणी सेक्टर-२२ मधील सरकारी शाळेत शुक्रारी हा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (student dies in school)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा इयत्ता दुसरीत शिकत होता. वर्ग सुरु असताना तो अचानक बेशुद्ध पडला. शिक्षकांनी व शाळेतील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होत. घडलेल्या या प्रकाराने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. काही क्षणापूर्वी हसत-खेळत असलेल्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्यानं सगळेच हादरले आहेत. तसंच, शाळेतील विद्यार्थीही अचानक झालेल्या या प्रसंगाने भांबावले आहेत.हा विद्यार्थि रोहिणी सेक्टर २२मध्ये असलेल्या सरकारी शाळेत दुसऱ्या वर्गात आहे. तर, तो लक्ष्मी विहार परिसरात राहतो. त्याचे वडिल रिक्षा चालक आहेत. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी जवळपास १२च्या सुमारास त्यांना शाळेतून फोन आला. एका शिक्षिकेनं त्यांना मुलाची तब्येत खराब झाल्याची माहिती दिली आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. ते रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं होतं.प्राथमिक तपासणीनंतर मुलाच्या शरिरावर मारल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच या प्रकरणाचा खुलासा होणार आहे. तर, आपल्या चिमुरड्या लेकाच्या मृत्यूने आई- वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *