एकनाथ खडसे-अमित शाह यांची दिल्लीत भेट ?

देश – विदेश


– शरद पवार यांना  दिली होती कल्पना ,एकनाथ खडसे  

मुंबई : राष्ट्रवादीचे   नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी दिल्लीत  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांची भेट घेतल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेवरुन जळगाव   जिल्ह्यासह राज्यभरात राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. मुक्ताईनगरचे  आमदार चंद्रकांत पाटील  यांनी एकनाथ खडसे   यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह  यांची भेट घेतल्याचा दावा केलाय. याच चर्चांवरुन एकनाथ खडसे  हे भाजपात  घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना ऊत आलाय. याबाबत आता भाजप खासदार रक्षा खडसे यांनी सासरे एकनाथ खडसे दिल्लीत अमित शाहांशी  भेट झाल्याच्या दाव्याला नकार दिला आहे. मात्र दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्यातील चर्चेमागचा सस्पेन्स कायम आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी या केवळ अफवा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याचं खडसेंनी मान्य केलंय. विकासकामांबाबत ही चर्चा झाल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *