पावसाळ्यात डेंग्यूचा धोका सर्वाधिक वाढतो. अशावेळी डेंग्यूची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे. ताप येणे, डोकेदुखी हे डेंग्यूची लक्षणे आहेतच. पण यासोबत पोटदुखी देखील डेंग्यूच लक्षण आहे. याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. अन्यथा जीवावर बेतेल. पोट दुखीवरील उपाय देखील जाणून घ्या.
डेंग्यूच्या तापामुळे सामान्य ते अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत अतिशय जास्त ताप येतो, ज्याला डेंग्यू मादा मच्छर एडीज इजिप्टी चावते त्याला हा ताप येतो. डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. डेंग्यू हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही, परंतु एखाद्या संक्रमित व्यक्तीला डास चावल्यास आणि नंतर सामान्य व्यक्तीला चावल्यास डेंग्यूचा प्रसार होऊ शकतो.उलट्या, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, हाडे दुखणे, जास्त ताप ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे मानली जातात. परंतु काही प्रकरणांमध्ये डेंग्यू तापामुळे पोटदुखीचा त्रासही जाणवतो. जाणून घेऊया, डेंग्यू तापामध्ये पोटदुखीची कारणे कोणती आहेत?डेंग्यूची लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात. बहुतेक लोक एका आठवड्यानंतर बरे होतात. डेंग्यूच्या सामान्य लक्षणांसोबतच काही गंभीर लक्षणेही असू शकतात. यामध्ये खालील लक्षणांचा समावेश आहे.
पोटदुखी
रक्ताच्या उलट्या
स्टूलमध्ये रक्त येणे
अधिक अशक्त वाटणे