नदीच्या पुलाचे कठडे तोडून पीकअप वाहन ५० फूट खोल नदीत कोसळले,

अकोला

गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथर्नमिक अंदाज

अकोला : जिल्ह्यात सुरू असल्या सतातधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज येणे तसे मुश्किलच आहे. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने चारचाकी वाहन तब्बल ५० फूट खोल नदीत कोसल्याची घटना म्हैसांग येथे घडली.
पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घेऊनच वाहन चालवणे, नदीला पूर आला असेल ते शक्यतोवर नदी ओलांडू नये असे आवाहन जरी प्रशासन करीत असेल तरी पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा आटापिटा हा करवाच लागतो अशाच परिस्थितीत घडतात ते अपघात अशाच प्रकारचा ऐक अपघात अकोला अमरावती रोड वर येत असलेल्या म्हैसांग येथे घडला. म्हैसांग मार्गे अकोला अमरावती हा रस्त चांगला झाला असल्याने वातुकीची वर्दळ या रस्त्यावर वाढली आहे. या रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या गाड्या व होणारे अपघात ही नित्याची बाब बनली असून काल मध्य रात्रीच्या दरम्यान अकोला येथून अमरावती कडे भाजी घेऊन जात असलेला एम एच ३० बी डी हे पीकअप वाहन म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलाचे कठडे तोडून हे वाहन थेट ५० फूट खोल नदीत पडले. गाडीचे टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघातात झाला या अपघातात सचिन वामन मालठे व विशाल गजान श्रीनाथ दोघे ही राहणार केळीवेळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *