अकबर खान
अकोला, १४ ऑगस्ट
शनिवारी हत्या झालेला विनोद टोबरे आणि मुख्य आरोपी सुहास वाकोडे रविवार पासून तडीपार होणार होते. तशी नोटीसच पोलिसांनी त्यांना बजावली होती. पण, शनिवारी रात्री हत्या झाल्यानंतर सर्वच चित्र बदलले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विनोद टोबरे यांच्यावर शोकावूâल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय अत्ययात्रेला उपस्थित होता. पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
न्यू तापडीया नगर येथील वाढती गुन्हेगारी ही आता जीवघेणी झाली आहे. याच गुन्हेगारीमुळे विनोद टोबरे याची हत्या झाली. या हत्येनंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी हा एमपीडीए अंतर्गत नाशिक येथून नुकताच आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मृतक विनोद टोबरे आणि मुख्य आरोपी हे रविवार पासून तडीपार होणार होते. पण, तत्पुर्वीच हे हत्याकांड झाले.
चौघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुर्ववैमन्यसातून हत्या झाल्याची माहिती
एमपीडीए मधुन सुटलेला आरोपी प्रकरण
न्यू तापडीया नगर येथे शनिवारी रात्री झालेल्या हत्याकांडानंतर परिसरात चांगलेच भितीचे वातावरण आहे. दरम्यान, विनोद टोबरे याच्या हत्येनंतर या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख संशयित म्हणून सुहास वाकोडे यांच्यावर लक्ष वेंâद्रित केले आहे. दरम्यान, सुहास वाकोडे हा एमपीडीए अंतर्गत नुकताच नाशिक कारागृहातून बाहेर आला होता. विनोद टोबरे याच्या हत्या प्रकरणात अजुन कोणाचा सहभाग आहे याचा पोलिस शोध घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात कसुन तपास सुरु केला असून न्यु तापडीया नगर येथील गुंडगिरी आता तरी पोलिस मोडून काढतात काय असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर पोलिस या भागातील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिकांची आहे. त्याच बरोबर सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे विभाजन करण्याची मागणी पुढे येत आहे. पोलिस कर्मचाNयांची कमतरता पाहता या भागातील गुन्हेगारी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुहास वाकोडे,सोनू उर्फ विशाल मंदिरकर,राहुल नामदेव म्हस्के, विशाल महादेव हिरोळे यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, मृतक विनोदच्या शरीरावर जवळ पास पंचवीस ठिकाणी जखमा आढळल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात अजुन काही आरोपी आहे काय याचा शोध पोलिस घेत आहे.