राज्य सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल डिझेल च्या दरात झाली इतकी कपात

Maharashtra State Uncategorized ब्रेकिंग

नगराध्यक्ष व सरपंच निवड प्रक्रिया देखील बदलली

मुंबई,
महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज (१४ जुलै) बैठक झाली. या बैठकीत नऊ मोठे निणNय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित कर्ज फेडणाNया शेतकNयांना ५० हजार रुपयांचं अनुदान यासारखे महत्त्वाचे निणNय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

एक नजर मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयावर
१. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निणNय (वित्त विभाग)
२. राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान’ राबवण्यात येणार (नगर विकास विभाग)
३. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० राज्यात राबवणार (नगर विकास विभाग)
४. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार (नगर विकास विभाग)
५. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा (ग्रामविकास विभाग)
६. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार
७. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)
८. बाजार समितीतील सर्व शेतक?्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा (पणन विभाग)
९. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार.
असे नऊ निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याच बरोबर राज्याच्या मंत्रीमंडळाचा लवकर च विस्तार होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आदिवासी भगिनी द्रौपदी मुर्मू यांना विजयी करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *