वाढीव वीज दर रद्द करण्याची ‘आप’ तर्फे मागणी

अकोला

हातरून  : आज सर्वसामान्य व्यक्ती वाढत्या किमतीमुळे अनेक आर्थिक समस्यांना तोंड देत आहे या नुषंगाने आम आदमी पक्षातर्फे बाळापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व वाढीव वीज रद्द करण्याव्यतिरिक्त इतरही मागण्यांचे निवेदन यावेळीतहसीलदार यांना देण्यात आले निवडणुकीच्या काळात भाजप शिवसेना नेत्यांनी जाहीरनाम्यात शंभर ते शून्य टक्के युनिटचे वीज मोफत देण्याची जाहीर केले होते त्यानुसार राज्य शासनाने संबंधित आश्वासन पाळण्याचे आवाहन आमच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केले कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ताळेबंदीमुळे व्यवस्था कमजोर झाली अनेकांचे रोजगार हिरावले गेले बाजारपेठ ठप्प असल्याने छोटे व्यवसाय काही व्यवसायिकही अडचणीत आले आधीच आर्थिकदृष्ट्या सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच महावितरण कंपनीने ग्राहकांना मोठ्या रकमेची देयक दिली होती अशातच 20% वीज दरवाढ करण्यात आली त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तांतरण झाले शिवसेनेतील शिंदे गट व भाजपने एकत्र येता सत्ता स्थापन केली मात्र या सरकारच्या काळातील 20% पर्यंत भाव वाढ करण्यात आली या त्यामुळे वाढ रद्द करण्यात यावी यासाठी मागणीसाठी 13 जुलै रोज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  निदर्शने करून दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. या वेळी अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *