गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या २० हजार ०४४ नवीन रुग्णांची नोंद, ५६ जणांचा मृत्यू

ताज्या घड्यामोडी

दिल्ली,

देशात गेल्या २४ तासांत ५६ मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ५,२५,६६० झाली आहे. भारतात सध्या कोविडचे एक लाखाहून अधिक (१,४०,७६०) सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २० हजार ०४४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच ५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारीही देशात कोरोनाचे २०,०३८ रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये पाच राज्यांपैकी पश्चिम बंगालमध्ये ३,०६७ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये २,९७९ प्रकरणे, महाराष्ट्रात २,३७१ प्रकरणे, तामिळनाडूमध्ये २,३१२ आणि ओडिशामध्ये १,०४३ प्रकरणे आहेत. देशात गेल्या २४ तासांत ५६ मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ५,२५,६६० झाली आहे. भारतात सध्या कोविडचे एक लाखाहून अधिक (१,४०,७६०) सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात १,६८७ सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. सध्या देशात कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण ९८.४८ टक्के आहे. गेल्या २४ तासांत एकूण १८,३०१ रुग्ण बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *