तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या वारी हनुमान येथील वाण धरणाचे 5 दरवाजे मंगळवारी सकाळी उघडण्यात आले असून या मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनान तर्फे देण्यात आली आहे. तसेच वाण नदी काठच्या सर्व गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,
गेल्या 24 तासांपासून वाण प्रकल्पाच्या क्याचमेन्ट भागात सर्वाधिक पाऊस पडल्याने सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, वान प्रकल्पाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आले असून त्या मध्ये 4 गेट हे प्रत्येकी ५० सेंटी मीटर उंचीने तर उर्वरित 2 दरवाजे हे 30 सेंटी मीटर नि उघडण्यात आले आहेत. तेल्हारा तसेच जळगाव जामोद भागातील 18 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी आर आर सी न्युज शी बोलताना दिली.