आता पाण्यातही कार्सची टेस्टिंग होणार

Economy

नवी दिल्ली : ANCAP Vehicle Submergence Test: तुम्ही आतापर्यंत वाहनांच्या क्रॅश टेस्टबद्दल ऐकलं असेल. कोणतीही कार प्रवासादरम्यान आतमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना अपघाताच्या वेळी किती सुरक्षितता प्रदान करते हे तपासण्यासाठी वाहनांची क्रॅश टेस्ट घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने एअरबॅग्स, कारची मजबुती आणि इतर इंटर्नल सेफ्टी फीचर्सची चाचणी केली जाते. या टेस्टिंगनंतर वाहनाला १ ते ५ च्या दरम्यान सेफ्टी रेटिंग (सेफ्टी स्टार रेटिंग) दिलं जातं. त्यानुसार ग्राहक कार खरेदी करताना काळजी घेतात. वाहन खरेदी करताना किमान ४ स्टार रेटिंग असलेल्या वाहनास प्राधान्य देतात. दरम्यान, आता वाहनांच्या सेफ्टीचं नेक्स्ट लेव्हल टेस्टिंग सुरू होणार आहे.

ऑस्ट्रेलियन इंडिपेंडंट क्रॅश टेस्टिंग अथॉरिटीने (ANCAP) सांगितलं आहे की ते जानेवारी २०२३ पासून कारची सबमर्जेंस (Submergence) टेस्ट सुरू करणार आहे. ही चाचणी तुमची कार पाण्यात पडताना, बुडताना किती सुरक्षित आहे हे सांगेल. पाण्यात किंवा पाण्यातून बाहेर आल्यानंतर तुमच्या कारचे वेगवेगळे पार्ट नीट काम करत आहेत का याची टेस्टिंग केली जाईल.

ANCAP ने म्हटलं आहे की वाहन उत्पादकांना पुरावा द्यावा लागेल की वाहन पाण्यात बुडल्यानंतर किमान १० मिनिटांपर्यंत कारचे दरवाजे आणि खिडक्या उघडता आल्या पाहिजेत. जेणेकरून कार पाण्यात पडल्यावर आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर निघता आलं पाहिजे. वाहन पाण्यात बुडल्यावर दरवाजे किंवा खिडक्या उघडत नसतील वाहन उत्पादक कंपन्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच अडचणीच्या प्रसंगी कारची खिकडी फोडून आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना सहज बाहेर पडता आलं पाहिजे. त्याची पद्धत कारच्या मॅन्युअल गाईडमध्ये द्यायला हवी.

अडल्ट सेफ्टीच्या बाबतीत एएनसीएपी कडक पावलं उचलत असताना चाईल्ड सेफ्टीच्या (लहान मुलांची सुरक्षितता) बाबतीतही संस्था गंभीर आहे. चाइल्ड प्रेझेन्स डिटेक्शन सिस्टमसाठी अथॉरटी नवीन फीचरवर काम करत आहे. ही यंत्रणा मागील सीट आणि दरवाजे यांचं निरीक्षण करेल. याद्वारे लहान मूल कारमध्ये अडकलं असेल तर त्याची सूचना चालकाला मिळेल. यासाठी चालकाच्या फोनवर अलर्ट पाठवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *