डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच, गाठला नवा ऐतिहासिक नीचांक

Economy


Rupee Vs Dollar : रुपयात सुरू असलेली घसरण कायम आहे. देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली घसरण (Rupee Falls Against Dollar) आणि आणखी मजबूत झालेला अमेरिकन डॉलर ( Rupee vs Dollar) यामुळे रुपयाची 13 पैशांनी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 79.58 रुपये झाले आहे. मागील सत्राच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत  रुपया 19 पैशांनी घसरला होता. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 79.45 प्रति डॉलर इतका स्तर गाठला होता. 
परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरामुळे चलन बाजारावर दबाव निर्माण केला असल्याचे म्हटले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये काही दिवस सुरू असलेल्या घसरणीमुळे रुपयांच्या घसरणीला ब्रेक लावला होता
एचडीएफसी सिक्युरिटीचे संशोधक विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, डॉलरमध्ये आलेली तेजी ही युरोप, ब्रिटन आणि जपानमधील कमकुवत दिसत असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे आहे. डॉलरची वाढलेली मागणी आणि परदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे रुपया सातत्याने कमकुवत होत आहे. 
इंटरबँक फॉरेन करेन्सी एक्सचेंज बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.55 रुपयांवर खुला झाला. त्यानंतर त्यात घसरण होऊन 79.58 रुपयांवर आला. मागील दिवसांच्या तुलनेत 13 पैशांची घसरण दिसून आली.अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर इंडेक्स 0.27 टक्क्यांनी वाढून 108.31 वर पोहचला आहे. तर, ब्रेंट क्रूडची किंमत वायदे बाजारात 1.43 टक्क्यांनी घटून 105.49 डॉलर प्रति डॉलर इतकी झाली आहे. 
रेलिगेयर ब्रोकिंग लिमिटेडचे डॉलर अॅण्ड करन्सी रिसर्च विभागाच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेवा यांनी सांगितले की, अमेरिकन अर्थव्यवस्थेत जूनमध्ये नोकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याशिवाय मध्यवर्ती बँकेकडून व्याज दरात आक्रमक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलरच्या दरात वाढ होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *