प्रभात किड्सची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
इतर शाळांचे अनेक विद्याथ्र्यांनी प्राप्त केले गुण

अकोला,
सीबीएसईच्या दहावीच्या निकालात आज मुलींनीच बाजी मारली आहे. या निकालाने अकोल्यातील मुलींनी देश पातळीवर आपली गुणवत्ता सिध्द केल्याचे चित्र आहे. दहावीच्या सीबीएसईच्या निकालात प्रभात किड्स ची दूर्वा डागा हिने ९९.२० टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.सीबीएसईचा दहावीचा निकालात अकोल्यातील विद्यार्थींनींचा उत्कृष्ट निकाल लागला. मुलींनीच बाजी मारली असून यात प्रभात किड्स च्या दूर्वा डागा हिने ९९.२० टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात प्रथक क्रमांक पटकावला. तर प्रभात किड्सच्या मधुश्री दळवी हिने ९८.६० टक्के, प्रथमेश तांडेल याने ९८ टक्के तर सोहम श्रीनगर याने ९६.६० टक्के गुण मिळविले. या यशाचे श्रेय विद्याथ्र्यांनी शाळेचे अध्यक्ष गजानन नारे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांना दिले आहे. त्याच बरोबर शाळाचा इतर निकाल देखील उत्कृष्ट लागल्याची माहिती गजानन नारे यांनी आर आर सी न्यूज सोबत बोलताना दिली.
तर पोद्दार इंटरनॅशनल येथे शिकत असलेल्या शर्वरी मंगेश मोहरील हिने शाळेत प्रथम क्रमांक पटकावित ९८ टक्के गुण प्राप्त केले. इतर शाळांमध्ये देखील सीबीएसई चा निकाल लागला असून अनेक विद्याथ्र्यांनी नव्वद टक्केच्या वर गुण प्राप्त केले आहे. तर अनेकांना विविध विषयात चांगले गुण प्राप्त झाले आहे.
