पोलीस,पत्रकार व समाज सेवक यांच्या पुढाकाराने एका अज्ञात महिलेचे वाचले प्राण

अकोला

अकोला :  माणसाच्या मनामध्ये मानवतावाद असला की मनुष्य खरी सेवा करू शकतो खरी निष्काम सेवा हीच ईश्वर सेवा अशी म्हण आहे ही म्हण आज सार्थकी ठरली असल्याची घटना आज सकाळी झाली आहे

आज सकाळी नऊ वाजता अंदाजे तीस वर्षीय महिला जिच्या अंगावर लाल कलरचे गाऊन घातलेल्या अवस्थेत ही महिला पातुर ते बाळापूर महामार्गावर देऊळगाव जवळ रोडच्या मधोमध झोपलेल्या अवस्थेत पडून होती. अनेक जन तेथून जात असतांना बघ्याची भुमिका घेत होते. तेव्हा तेथून शेताकडे जात असलेला आकाश गहिले याने ही घटना बघीतली व लगेच आपल्या मोबाईल  कर्तव्य दक्ष पत्रकार देवानंद भाऊ गहिले यांना कळविली. त्यांनी ही क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली व या घटनेची माहिती पातूरचे ठाणेदार हरीष गवळी यांना देवून सोबत ही माहिती वनराई गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत बोरकर व पातूर तालूका विकास मंचाचे संयोजक शिवकुमार बायस यांना दिली त्यांनी ही तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले.
काही वेळातच पातुरचे पोलीस यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही साठी पोलीस स्टेशन ला घेऊन गेले.
या महिलेला तिच्या घरी सुखरूप पोहचवावे तसेच तिच्या नातेवाईकांना तिची माहिती व्हावी तिच्या सोबत कुठलाही अपघात होवू नये याकरिता आणी या महिलेचे प्राण वाचविण्या करिता पुढाकार घेणाऱ्या पातूर पोलीस,पत्रकार,समाज सेवक तसेच प्रमोद श्रीनाथ,आकाश गहिले, सुनिल बराटे,संतोष उपर्वट, योगेश गोतरकार यांच्यासह इतरांनी महत्वाची भूमिका घेतली
उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी घेतली तात्काळ दखल

सदर अज्ञात असलेल्या महिलेची माहिती बाळापुर पोलीस उपविभागीय प्रभारी अधिकारी रितू खोकर यांना माहिती पडताच त्यांनी पाठपुरावा करून या कामी कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचा पुरावा दिला आणि या महिलेचे प्राण वाचविण्याकरिता महत्त्वाचे योगदान दिले

सदर महिलेची ओळख पटली नाही

पातुर ते बाळापूर या राज्य मार्गावर भटकंती करत असलेली महिला ही कोण आहे याबाबत मात्र अद्याप समजले नाही या महिलेची आमचे प्रतिनिधी यांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र थोडी मती मंद असल्याने या महिलेने व्यवस्थित ओळख दिली नाही त्यामुळे सदर महिला कोण आहे व या राज्य मार्गावर कशासाठी आली या बाबत चौकशी करिता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

डॉक्टर श्रीकांत बोरकर यांनी जोपासली माणुसकी

पातुर चे पत्रकार देवानंद गहिले यांनी घटनास्थळावर महिला असल्याची माहिती दिल्यावरून डॉक्टर श्रीकांत समाधान जी बोरकर घटनास्थळावर आले व त्यांनी या महिलेची संपूर्ण जबाबदारी सामाजिक सेवा म्हणून स्वीकारली आणि  पातुर पोलीस स्टेशनला या महिलेला आणल्यानंतर या महिलेचा सांभाळ करण्याकरता सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत या महिलेचा सांभाळ करण्याकरता डॉक्टर श्रीकांत बोरकर यांचे माध्यमातून पाठविण्यात आले आहे
यावेळी पोलीस कर्मचारी मयूर उमाळे, अरुण येनकर, महिला पोलीस कर्मचारी गंगा सोळंके, डॉक्टर श्रीकांत बोरकर, शिवकुमार सिंह बायस संयोजक पातुर तालुका विकास मंच प्रमोद श्रीनाथ योगेश गोतरकर किरण राखोंडे आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *