सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही हसवतात, तर काही आश्चर्यचकित करतात. याशिवाय हृदयाला स्पर्श करणारे काही व्हिडिओ आहेत. लोकांना शिकवण्याचं काम हे व्हिडीओ करत असतात. आयुष्य कसं जगलं पाहिजे, हे व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल.
वाघ, सिंह, बिबट्या असे कधीही न दिसणारे प्राणी जंगल सफारी, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहालयात गेल्यावर जेव्हा दिसतात तेव्हा कुणालाही आनंद होतोच. पण त्यासोबत घामही फुटतो. समोर दिसला तरी या प्राण्यांच्या जवळ जाण्याची हिंमत कुणीच करणार नाही. कधी-कधी वाहतूक पोलीस लोकांना रस्ता ओलांडायला मदत करतात, तुम्ही अनेकदा असे व्हिडीओही पाहिले असतील. पण तुम्ही कधी ट्रॅफिक पोलीसाला वाघाला रस्ता ओलांडून देताना पाहिलं आहे का? कदाचित पाहिलं नसेल, कारण अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात, पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळतंय. एका ट्रॅफिक पोलिसाने चक्क वाघासाठी रस्त्यावरची सगळी वाहतूक थांबवली. तसंच वाघ सुद्धा अगदी रूबाबात आणि ऐटीत रस्ता ओलांडताना दिसून आलाय.