जालना : शिवसेनेचे जालन्यातील माजी आमदार अर्जुन खोतकर यांनीही आता शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची धाड पडली होती.जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाचा रस्ता धरल्याने मराठवाड्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यावेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.