न्यू किराणा मार्केटमधील 6 दुकानात चोऱ्या

अकोला



– आधी चेन स्नॅचिंग मग दरोडा आणि आता किराणा मार्केटच्या दुकानात चोरी

जुने शहर परिसरातील न्यु किराणा मार्केटमध्ये मंगळवारी सकाळीच 6 दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास जुने शहर पोलीस करत आहेत.

अकोल्यातील न्यू किराणा मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी व्यापारी दुकाने उघडण्यासाठी आले असता एकच खळबळ उडाली, 6 दुकान मालकांना त्यांचे शटर तुटलेले दिसले, या बाबत जुना शहर पोलिसांना तत्काळ कळविण्यात आले. घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. किराणा मार्केटमध्ये सुरक्षा रक्षक आणि पोलीस चौकी असतानाही ही घटना घडली हा सर्वात मोठा प्रश्न आहे.काही दिवसांपूर्वी अकोल्यात वारंवार चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या, त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर दिवसाढवळ्या दरोडा पडला होता आणि आता न्यू किराणा मार्केटमधील 6 दुकानांमध्ये चोरी झाली आहे. या घटनांमुळे मानवी गुन्हेगारांचे मनोबल उंचावलेले दिसत आहे आणि पोलीस खाते कमकुवत दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *