पाणी जीवन आहे नियोजन नसेल तर संकट आहे.

Maharashtra State

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र मध्ये उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू महाराष्ट्रातील जनतेला प्रभावित करणारे ठरत आहे उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून तर वापरण्याच्या पाण्यापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते येवढेच नव्हे तर पाण्याअभावी शेतीविषयक समस्यांना अनेक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते ,यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची का होईना पण शासन सुद्धा मदत करते महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे स्थलांतराचा प्रश्न भेडसावत असून बऱ्याच वेळी पर्याय नसल्याने स्थलांतरित व्हावे लागते तर बऱ्याच वेळा हजारो मैलांवरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये काही प्रमाणात आपली जबाबदारी पार पाडतात परंतु नागरिकांना आवश्यक असणारी गरज मात्र यामध्ये पूर्ण होत नसल्याचे दिसते, तर दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे. सोबतच शहरी आणि ग्रामीण भागात नियोजनाचा अभाव असल्याने पावसाळ्यातील पाहिल्या दुसऱ्या पावसात लोकांच्या घरात पाणी जात असल्याचे आज पाहावयास मिळते हे देखील प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची गंभीर अक्षम्य चूक आहे. मात्र शासन आणि प्रशासनाचे साटेलोटे असल्यामुळे समस्या निराकरण करणे शक्य होत नाही, राज्यपातळीवर विविध योजना राबविण्यासाठी मोठा निधी लोकप्रतिनिधींना प्राप्त होतो मात्र काही करण्याची इच्छा नसल्याने आणि समस्यांच्या तळाशी जाता येत नसल्याने बराच निधी हा परत शासन दरबारी जातो, आज उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू प्रशासनासमोर आवाहन असल्याचे दिसते, चार भिंतीच्या आत महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्यांचे नियोजन करून समस्या केव्हाच सुटणार नाही आज जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर प्रत्यक्ष येऊन जिल्हा नियोजन विभागाने काम करून त्या बाबत योग्य तो आराखडा तयार करून शासन दरबारी देण्याचे कार्य करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही लोकांना उन्हाळ्यात पाण्याकरिता भटकंती करावी लागते तर पावसाळ्यात पाण्यामुळे भटकंती करण्याची वेळ आज आली आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार उन्हाळ्यात किती पाण्याची आवश्यकता भासते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या कडे असलेले धरण, कालवे, तळे, विहिरी बारोमास वाहणाऱ्या नद्या किंवा अन्य पाणी साठवण्याचे स्रोत आज आहेत तेवढे पुरेसे आहेत का ? किंवा नसतील तर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी किती पाणी साठवणुकीची आवश्यकता आहे याचे नियोजन प्रशासनाने करणे गरजेचे आहे, आज हि समस्या नियोजनबद्ध पद्धतीने सोडविली नाहीतर भविष्यात मोठे संकट महाराष्ट्रात येणार हे नक्कीच आहे. आज ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर पाणी साठवण्याचे प्रयोजन नसल्याने पावसाचे पाणी येते आणि शेती तसेच जनजीवन विस्कळीत करून जाते. दुसरीकडे शहरात आज सर्वीकडे सिमेंटीकरण झाल्याने आणि महापालिका आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पडत नसल्याने शहरात पहिल्याच पावसात पाणी घरात घुसल्याचे अनेक उदाहरणे समोर आले आहे. पडणाऱ्या पावसाचे योग्य पद्धतीने नियोजन झाल्यास उन्हाळ्यात पावसाची समस्या राहणार नाही. आज पावसाची आवश्यकता आहे मात्र जास्त पावसाचे विसर्ग कशा पद्धतीने करायचे याचे प्रयोजन आधी केलेले बरे राहणार त्या करीता आज युद्ध पातळीवर कार्य करण्याची गरज आहे. पाणी जीवन आहे मात्र नियोजन नसेल तर पाणी मोठे संकट आहे. हि बाब प्रशासन लक्षात घेणे गरजेचे आहे.

प्रशांत पळसपगार – संपादक, सिटी न्यूज सुपरफास्ट, अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *