बॉम्बचा फेक कॉल, पोलिस तपासानंतर बंदोबस्त वाढविला रेल्वेसह भाजप खासदाराचं घरं बॉम्बने उडवण्याची धमकी

अकोला क्राइम ब्रेकिंग

अकोला,
अकोल्यात उभ्या असलेल्या पुर्णा पॅसेंजर व खासदार संजय धोत्रे यांचे घर बॉम्बने उडवून देण्याचा खोटा कॉलने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान पोलिसांनी दोन्ही ठिकाणी तपासणी केल्यावर त्यात काही तथ्य आढळले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आज सकाळी खा.धोत्रे यांच्या घराची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून वरिष्ठांनी खा.धोत्रे यांच्या घराची पाहणी करत सुटकेचा निःश्वास सोडला.
पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे आणि अकोल्याचे भाजपचे खासदाराचं घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाने अकोला पोलिसांना दिली. अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच अकोला पोलीस दलात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी काल मंगळवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांपर्यत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. यासोबतच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी झाली. तर खासदार संजय धोत्रेंच्या रामनगर भागातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला.
काल २६ जुलैला अकोला रेल्वे पोलिसांना अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर (रेल्वे क्रमांक १७६८३) या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचा आणि अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याची धमकीचा कॉल मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला आला. त्यानंतर अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाNयांनी आणि कर्मचाNयांनी अकोला रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. अन् रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी असलेली अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी सुरु केली. या दरम्यान, रेल्वेच्या प्रवाशांची कसून चौकशीसह तपासणी झाली. या घटनेने काल अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. काल मंगळवारी रात्री १० वाजतापासून रेल्वेची तपासणी सुरु झाली अन् तब्बल अर्धा तास ही शोध मोहीम चालली. श्वान पथकाद्वारेही या तपासणीला सुरुवात झाली. बघता बघता सर्व रेल्वेच्या डब्यांची तपासणी झाली.
यादरम्यान रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे फोटो काढण्यात आले. झडतीदरम्यान डब्यांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू, संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही. त्यानंतर रेल्वे आपल्या मार्गाने रवाना झाली. यादरम्यान धमकी देण्यात आलेला फोन फसवणूक करण्यासाठी आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी अकोला जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रमुख अर्चना गडवे आणि मुंबई पोलिसांद्वारे या बॉम्ब कॉलचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *