ग्राम पंचायत प्रशासनाने लावलेल्या कचरा कुंडया अज्ञात व्यक्तीने उपटून फेकत्या
मेन रोड वर डपक्यामुळे अपघाताची शक्यता संबंधीत विभागाने लक्ष देण्याची गरज
सरपंच मेजर मंगेश तायडे – वाडेगांव येथील सेंट्रल बॅके समोर काही राजकीय व्यक्तीच्या सांगण्यानुसार जानीव पुर्वक आजुबाजुचे नागरीक येथे घानकचरा आनुन टाकत असल्याने सर्वत्र दुर्घंधी पसरली असल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून ग्राम पंचायत वाडेगांव मार्फत वेळोवेळी गावत धोंडी देऊन कचरा गाडीत कचरा टाकण्यात यावा असे सांगुन सुध्दा नागरीक त्याच ठिकाणी कचरा टाकत असून येथील कचरा मजुर व जे सी बी मार्फत उचलण्यात येतो मात्र तरी सुधा परिसरातील नागरीक तेथे कचरा टाकत असल्यान हम नही सुधरेंगे याचा प्रत्यय येत आहे.
वाडेगाव: -बाळापूर वरून पातूर कडे जात असळलेल्या महमार्गच्या मध्यभागी असलेल्या वाडेगाव बसस्थानक परिसरात सततच्या पावसाने रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असून काही ठिकाणी कचराचे ढीग दिसून येत आहेत.या मूळे ग्रामस्थाचे आरोग्य बिघडतच आहे तर डबक्यातुन वाट शोधावी लागत असल्याचे चित्र या परिसरात मागिल आठ दिवसापासून पाहायला मिळत आहे.
स्थानीक महामार्गावरील एका स्थानिक बँकेसमोरून जाणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थकडून कचरा टाकला जात आहे .परिणामी या रस्त्यावरील कचरा गावतील डुकरे अर्ध्या रस्त्यावरून इकडे तिकडे चोहीकडे फेकल्या जात आहे.या कचऱ्यामधून मोठ्या प्रमाणात दुर्घधी पसरत आहे.येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थयांना विद्यार्थ्यांना नाकाला रुमाल लावून मार्ग काढावा लागतो तर काही अंतरावर जाऊन या ठिकाणी स्टेट बँक समोर,बसस्थानक परिसरात ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले दिसून येत आहे.तसेच या पाण्याला जाण्यासाठी वहिवाट दिसून येत नाही.या पाण्यच्या डबक्या जवळून विद्यार्थ्यांना प्रवाशी यांना रस्ता शोधत मार्गक्रमण करावा लागतो.यामुळे डबक्या जवळून जात असताना एखादे वाहन गेल्यास त्या वाहानाद्वारे उडलेले पाणी कधीही पादचारी यांच्या अंगावर उडू शकते.तरी गँभिर प्रकाराकडे संबधित विभागाने या रस्त्यालगत असलेल्या दोन्ही बाजूने नाल्या काढण्यात याव्या अशी मागणी विद्यार्थ्याकडून व पालक,प्रवाशी यांच्याकडून होत आहे.जनेकरून जाणा येणाऱ्या ग्रामस्थाना घरी सोयीस्कर जाता येईल.तसेच पाण्याची वहिवाट काढावी लागत आहे.