
जिल्हाध्यक्षपदी डॉ प्रसन्नजीत गवई तर सचिव पदी डॉ विनोद खैरे यांची निवड
प्राध्यापक व शिक्षकांच्या न्याय्यहक्कासाठी लढणारी डॉ बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन अर्थात डाटा च्या अकोला जिल्हा कार्यकारिणीची विभागीय महासचिव डॉ एम आर ईंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच निवड करण्यात आली. स्थानिक व्ही आय पी विश्राम गृह येथे माजी जिल्हाध्यक्ष डॉ एस एम भोवते यांच्या अध्यक्षते खाली तसेच मार्गदर्शक डॉ बि एच किर्दक, प्रा एस आर दामोदर, डॉ भास्कर पाटिल, डॉ डि आऱ खंडेराव, डॉ अशोक ईंगळे, प्राचार्य डॉ संतोष पेठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत सर्वानुमते डाटा च्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी डॉ प्रसन्नजीत गवई तर सचिव पदी डॉ विनोद खैरे यांची निवड करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन ‘डाटा’ ही संघटना नोंदणीकृत असुन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या सोडवण्यासोबतच सामाजिक न्यायासाठी संवैधानिक व सदनशिर मार्गाने लढणारी व न्याय मिळवून देणारी सामाजिक बांधिलकी जोपासणारी संघटना आहे. डाटा संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत अनेक प्राध्यापक व कर्मचारी यांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या आहेत. अकोलाजिल्हा नवीन कार्यकारिणी निवडी करिता बोलावण्यात आलेल्या सभे मध्ये डाटा संघटना अकोला जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रसन्नजित गवई, जिल्हा सचिव म्हणून प्रा. डॉ. विनोद खैरे, उपाध्यक्ष पदी प्रा. राहुल माहुरे व प्रा. राहुल घुगे, सहसचिव म्हणून प्रा. डॉ. दिपक कोचे, कोषाध्यक्ष पदी प्रा. डॉ. अशोक इंगळे तर, सदस्य म्हणून प्रा. अनिल निंबाळकर, प्रा. डॉ. हरिचंद नरेटी, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांची तर कायदेशीर सल्लागार म्हणून प्रा. डॉ. निरज अंभोरे यांची निवड करण्यात आली उर्वरित ७ तालुक्यातुन ७ प्रतीनिधिंची लवकरच निवड करुन जिल्हा कार्यकारिणी चा विस्तार करण्यात येईल. यावेळी ॲड. डॉ निरज अंभोरे, प्रा एस एन वानखडे, डॉ कैलास वानखडे, डॉ अशोक वाहुरवाघ, प्राचार्य डॉ पद्मानंद तायडे, प्राचार्य डॉ किशोर वाहणे, प्रा डि एम गायकवाड, प्रा प्रमोदिनी ननिर, डॉ मनीषा कांबळे(पेठे), डॉ राजेश नितनवरे, प्रा सुधाकर मनवर, प्रा अजय शिंगाडे, प्रा जयंत मोहोड, प्रा प्रवीण दामोदर, प्रा आकाश हराळ, राजदिप गवई, विशाल नंदागवळी विद्वत सभेचे डॉ संजय पोहरे, विद्वत सभेचे सिद्धार्थ देवदरिकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.