उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदेंकडून पक्षप्रमुख पदाचा उल्लेख नाही….

Maharashtra State

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी (२७ जुलै) जन्मदिनाच्या शुभेच्छा देत ट्वीट केलं. यात त्यांनी त्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला, मात्र पक्षप्रमुख या पदाचा उल्लेख टाळला. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत बंडखोर शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी मी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांवर काहीही बोलू शकत नाही, असं मत व्यक्त केलं. राहुल शेवाळे यांना तुम्हाला उद्धव ठाकरेंना नेमक्या काय शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या की पक्षप्रमुखांना असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शेवाळेंनी त्यांचं जे जे पद आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहे, असं म्हटलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत शुभेच्छा देताना पक्षप्रमुख पदाचा उल्लेख न केल्याबद्दल विचारणा केली असता शेवाळे म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांवर मी काहीही बोलू शकत नाही. आम्ही दरवर्षी ज्या शुभेच्छा देतो त्या आम्ही दिल्या आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *