
आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. कतृत्ववान लोकांना ते प्रोत्साहन देतात. सध्या आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने महिंद्राची नवीन एक्सयूव्ही ७०० विकत घेतली. या व्यक्तीसोबत त्यांची मुलगी देखील होती. एक्सयूव्ही पाहून चिमुकल्या मुलीचा आनंद गगनाला मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे. यावर आनंद यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
थोटा श्रीकांत यांनी महिंद्राची नवीन एक्सयूव्ही ७०० विकत घेतली. ही गाडी घेताना त्यांनी शोरूममध्ये काढलेले त्यांचे काही छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहेत. यात श्रीकांत वाहनाच्या एका बाजूस उभे आहेत तर त्यांची मुलगी ही कारच्या दुसऱ्या बाजूला उभी आहे. कारचा दरवाजा खोलताना या मुलीच्या चेहऱ्यावर निखळ आनंद तुम्हाला दिसून येईल. मुलीची प्रतिक्रिया पाहून आनंद महिंद्रा यांना ट्विटरवर पोस्ट करण्यावाचून राहिले नाही.श्रीकांत यांनी आनंद महिंद्रा यांना टॅग करून पोस्ट शेअर केली आहे. एक्सयूव्ही ७०० घेतल्यानंतर माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही पाहा, असे श्रीकांत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यावर आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करून प्रतिक्रिया दिली.