आसाममध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी ११ जणांना ताब्यात करण्यात आली आहे. अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट आणि अन्सारुल्ला बांग्ला या दहशतवादी संघटनांशी त्यांच्या संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एकाला मोरीगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती मदरसा शिक्षक असल्याचे पुढे आले आहे. मुस्तफा असं या व्यक्तीचे नाव आहे.
आसामा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या ११ जणांचा अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट आणि अन्सारुल्ला बांग्ला या दहशतवादी संघटनांशी संबंध आहे. तसेच त्यांच्याकडून काही इलेट्रॉनिक उपकरणं आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. मोरीगाव जिल्ह्यातील सहारिया गावात राहणारा आरोपी मुस्तफा उर्फ मुफ्ती मुस्तफा अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) मॉड्यूलचा हा भारतातील प्रमुख होता. तो सहारिया गावात जमीउल हुदा मदरसा नावाने मदरसा चालवतो. पोलिसांनी हा मदरसा सील केला आहे.