ओबीसी प्रवर्गातील महिलांचे आरक्षण घोषित
ओबीसी प्रवर्गातील पुरुषांचे आरक्षण घोषित
सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण घोषित
महापालिकेत आज ओबीसी प्रवर्गातील महिलांच्या बारा जागांसाठी, तसेच ओबीसी प्रवर्गातील पुरुषांच्या बारा जागांसाठी तर सर्वसाधारण प्रवर्गातील २५ महिलांचे आरक्षण प्रमिलाताई ओक सभागृहात काढण्यात आले. प्रशासक कविता द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीला इच्छूक उमेदवारांची गर्दी होती.
आज निघालेल्या तीन आरक्षण सोडतीत ओबीसी प्रवर्गाताली पुरुष व महिलांचे आरक्षण काढण्यात आले तर त्याच बरोबर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठीचे आरक्षण घोषित करण्यात आले. ओबीसी महिलांसाठी राखीव आरक्षित प्रभाग क्रमांक २ ब, ४ ब, ८ ब, १३ ब, १६ ब, १७ अ, २० ब,२२ अ, २५ ब,२६ अ. २८ अ, ३० ब, हे सर्व प्रभागातील उपभाग हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. तर ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी प्रभाग क्रमांक १ अ, ५ अ, ६ ब, ७ अ,९ ब, १० ब, ११ अ, १५ अ, १९ ब, २१ अ, २३ ब, २४ ब यांचा समावेश हा ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी राखीव मतदार संघ असेल. तर सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा १ ब, ३ ब, ४ क, ५ ब, ६ क, ७ ब, ८ ब, ९ क,११ ब, १२ ब, १३ ब, १४ ब, १५ ब,१६ ब, १७ ब, १८ ब, १९ ब ,१९ क,२२ ब, २६ ब, २५ क, २७ ब, २८ ब, २९ ब, ३० ब या सर्वसाधारण महिलांच्या प्रवर्गासाठी राखीव जागा आज आरक्षित करण्यात आल्या. या प्रभागातून कुणी ही महिला उमेदवार या निवडणूक लढवू शकतील.