
बॉलिवूडप्रमाणे छोट्या पडद्यावरील कलाकार देखील लाखो रुपयांचं मानधन घेतात. या कलाकारांचं लाईफस्टाईल बॉलिवूड कलाकारांसारखंच असतं. त्यांच्याकडे देखील मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू कंपनीच्या लग्झरी कार पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावरील कलाकारांकडे असलेल्या महागड्या कार्सची माहिती देणार आहोत.आपण नेहमी बॉलिवूड स्टार्सच्या महागड्या कार कलेक्शनबद्दल बोलतो, क्रिकेटपटूंच्या कार कलेक्शनची चर्चा करतो.

मात्र खूप कमी लोकांना माहिती असेल की छोट्या पडद्यावरचे कलाकार देखील लाखो, करोडोंच्या गाड्या घेऊन मिरवतात. मुळात छोट्या पडद्यावरचे कलाकार देखील दिवसाला लाखो रुपये कमावतात. त्यामुळे त्यांचं लाईफस्टाईल देखील एखाद्या बॉलिवूड स्टारइतकंच आलिशान असतं. त्यामुळे त्यांच्याकडे देखील आलिशान कार्स असणं स्वाभाविक आहे. छोट्या पडद्यावरील कलाकार देखील मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या लग्झरी वाहन उत्पादक कंपन्यांच्या महागड्या कार्स घेऊन फिरताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावरील कलाकारांकडे असणाऱ्या महागड्या कार्सची माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्हाला रुपाली गांगुली, राकेश बापट पासून ते इन्स्टाग्राम स्टार उर्फी जावेदपर्यंतच्या सेलिब्रेटींकडे असणाऱ्या आलिशान गाड्या पाहायला मिळतील.