गरोदरपणातही आलिया भट्ट चं काम पाहून चाहते थक्क; म्हणाले ही तर ‘बॉस लेडी’

Entertainment

मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’, 2022 मधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 183.82 कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आलिया सध्या गरोदर असूनही खूप हार्ड वर्क करत असल्याचं दिसत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचाै वर्षाव होतोय.आलिया भट्ट गरोदरपणातही पूर्ण उत्साहाने काम करतेय. हे पाहून तिचे चाहते खूप आनंदी आणि प्रभावित झाले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, ‘इंडस्ट्रीत अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी गरोदरपणातही खूप काम केले आहे. आता या यादीत आलिया भट्टच्या नावाचाही समावेश झाला आहे’. आलियाचा नवा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओवर बॉस लेडी, हार्डवर्किंग लेडी, अशा अनेक कमेंट येत आहेत. आलिया भट्ट बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचबरोबर तिने गरोदरपणात ज्या प्रकारचे कपडे घातले आहेत, त्याचे कौतुक चाहत्यांकडून होतंय. तिला पाहून अनेकांना फॅशन टीप्स मिळाल्या असल्याचं म्हटलं जातंय.दरम्यान, 14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी घरात एका खाजगी समारंभात लग्न केले. यामध्ये केवळ मित्र आणि कुटुंबीयांचा सहभाग होता. यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने गरदोरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या बातमीने दोघांच्याही चाहत्यांना सुखद धक्काच बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *