महापालिकेतील दिग्गजांना फटका
राजकीय पक्षांना बाजुला करत राजकारण
राजकीय पक्षांपेक्षा उमेदवारांना विजयी होण्यासाठी उमेदवारांनी आता पासूनच फिल्डिंग लावणे सुरु केले आहे. प्रभाग निहाय पॅनलची तयारी अनेक उमेदवारांची पुर्ण झाली असून यात मुख्यतः स्वपक्षीयांचा समावेश नसल्याची माहिती मिळाली आहे.
महापालिकेचे आरक्षण घोषित झाल्याने आता निवडणूकीच्या अधिसुचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण निघाल्यानंतर पक्षीय राजकीय नेत्यांपेक्षा निवडणूकीत विजयी होण्यासाठीचे वैयक्तिक पॅनल तयार करण्याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष वेंâद्रित केले आहे. महापालिकेत विजयी होण्यासाठी स्वतःच्या विजया बरोबर इतरांचा पराभव कसा होईल या दृष्टीने गणिते आखली जात आहे. राजकीय नेत्यांनी पक्षातील नेत्यांशी कमी आणि प्रभागातील इतर राजकीय नेत्यांशी संपर्वâ वाढविला असून त्यांच्या मार्पâत विजयाचे गणित सुनिश्चित केले जात आहे. पॅनल मधील स्वपक्षीय उमेदवारांनाच यातून दगाफटका होणार आहे. राजकीय पक्षांना बाजुला करत प्रभागातील तीन चे पॅनल कसे निघेल याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष वेंâद्रित केले आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांच्या आधारावर निवडणूका लढविणारे आजच पराभूत झाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी निघालेल्या आरक्षणानंतर अनेक विद्यमान नगरसेवकांना घरी बसवले आहे. तर काहींचे भाग्य उजाळल्याचे चित्र आहे.