अभिनेत्री मलायका अरोरा मलायकाने मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका फॅशन शोला हजेरी लावली होती. या शोसाठी तिने काळ्या रंगाचा सी थ्रु ड्रेस परिधान केला होता. अभिनेत्रीच्या या ट्रान्सपरंट ड्रेसने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. मलायकाच्या उपस्थितीने या शोला चार चाँद लागले. इतकंच नव्हे तर तिने रॅम्प वॉकही केलं. मलायकाने रॅम्प वॉकवर एण्ट्री करताच उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. या आकर्षक ड्रेसवर तिने हाय हिल्स घालणं पसंत केलं.तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा मलायकाला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल देखील केलं जातं. पण ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करते. फॅशनच्याबाबतीत नवनवीन प्रयोग करणं आणि तितक्याच आत्मविश्वासाने प्रत्येक ड्रेस परिधान करणं ही मलायकाची खासियत आहे. आता पुन्हा एकदा ती तिच्या ट्रान्सपरंट ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. तिचा नव्या लूकमधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.