“मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक

Entertainment

सध्या शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. गेली ३ वर्षं चित्रपटात न झालकणारा शाहरुख आता येणाऱ्या वर्षात तब्बल ३ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या तीनही चित्रपटांसाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुर आहेत. ‘पठाण’, जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटातून शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. खरंतर ‘पठाण’ याचवर्षी प्रदर्शित होणार होता पण काही कारणास्तव तो पुढे ढकलला गेला.

‘पठाण’च्या सेटवरचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. लोकं शाहरुखच्या नव्या लूकसाठी प्रचंड उत्सुक आहेत. अशातच नुकतंच शाहरुखने एक पोस्ट करत तोदेखील पठाणची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या ‘पठाण’लूकमध्ये दिसत आहे. बरोबरच तो या फोटोमध्ये शर्टलेस बसला आहे आणि त्याचे सिक्स पॅक दाखवत आहे. शाहरुखचा हा फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर प्रचंड कॉमेंट करायला सुरुवात केली आहे. त्यांना शाहरुखचा हा लूक प्रचंड आवडला आहे.हा फोटो शेअर करताना सिलसिला चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची एक कविता त्याने आपण न घातलेल्या शर्टला उद्देशून लिहिली आहे. या कवितेतल्या ४ ओळी लिहून त्याने खाली लिहिलंय की “मीसुद्धा पठाणची वाट पाहतोय.” शाहरुखचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे शिवाय त्याचा चाहते हे त्याच्या या बेअर बॉडीमधील लूकच्या प्रेमातच पडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *