: काँग्रेसने देशभरात महागाईविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावरही राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याशिवाय ईडी कारवाईवरूनही आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे.
पुण्यात महापालिका निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुण्यात प्रामुख्याने भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये लढत होणार असे दिसत आहे. असं असलं तरी काँग्रेस देखील आता मोठ्या ताकतीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणातून बाजूला असलेले काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी सक्रीय झाले आहेत.