महान येथील काटेपुर्णा प्रकल्पाचे दहा दारे उघडलीत….या पंधरा गावांना सतर्वâतेचा इशारा

अकोला

काटेपुर्णा प्रकल्पाचे १० वक्र दरवाजे उघडले
नदीकाठच्या गावांना दिला सतर्कता इशारा
या गावकNयांनी दक्षता घेण्याची गरज व्यक्त


अकोला जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून काटेपूर्णा धरणाकडे पाहिलं जातं. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र अलर्ट देण्यात आलाय. जिल्ह्यातले सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. काटेपूर्णा धरणही ओव्हर फ्लो झाल्यानं धरणाचे १० वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. पंधरा गावान सतर्वâतेचा इशारा देण्यात आला आहे.


रात्रभरापासून वाशीम व अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्या मुळे अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रकल्प असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पच्या पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वेगाने वाढ होत असून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, काटेपूर्णा प्रकल्पाचे सर्वच १० वक्र द्वार उघडण्यात आले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. बार्शीटाकळी तालुक्यातील महान, दोनद बु, दोनद खु, कुरणखेड, कानशिवणी तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील दाबा, पिंगळा, झुरुगवाडा, एंडली, या गावांना पुराचा धोका संभवतो. तसेच इतर काही गावे नदी पात्रा पासून दूर असल्याने या ठिकाणच्या शेतीला मोठा धोका निर्माण होतो. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान दगडपारवा प्रकल्पात येत असणाNया मैसपूर, चांदुर, बाटा, वरखेड, सिंदखेड, वाघझळी, बाळापूर, बोरगाव वैराळे, हातरुन यांना धोका आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. काटेपूर्णा प्रकल्पाचे सर्व द्वार उघडल्याने महान नदी वरील पुलावरून पाणी रात्री उशिरा वाहत असल्याने अकोला मंगरूळपीर हा मार्ग बंद करण्यात आला असून सध्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *