अर्पिताच्या घरात सापडले ५० कोटी, संजय राऊत यांच्या कडे निघाले साडेअकरा लाख

देश – विदेश

देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या छापेमारीसंदर्भातील दोन प्रकरणं चांगलीच चर्चेत आहेत. यामधील पहिलं प्रकरण म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडूप येथील घरावरील छापा आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कोलकात्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जीच्या घरांवरील छापेमारी. ईडीला राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडली आहे तर अर्पिता यांच्या दोन वेगवगेळ्या फ्लॅटमध्ये ५० कोटींहून अधिक रक्कम सापडलीय. अर्पिता यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिनेही ईडीला सापडले आहेत. पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता यांचा शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंध असल्याचा दावा या छापेमारीनंतर केला जातोय.या दोन बहुचर्चित प्रकरणांची वृत्तवाहिन्यांपासून ते समाजमाध्यमांपर्यंत सगळीकडेच तुफान चर्चा दिसून आली. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आता लोकांकडून नेमकी किती रोख रक्कम अथवा सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्यास परवानगी आहे अशापद्धतीचे प्रश्नही सर्च केले जात आहेत. घरात किती रोख रक्कम ठेवता येते अथवा किती सोन्याचे दागिने घरात ठेवावेत यासंदर्भात काही नियम अथवा कायदा आहे का याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक इंटरनेटची मदत घेत असल्याचं चित्र दिसत आहे.आपल्या इच्छेप्रमाणे घरी पैसे ठेवण्याची मूभा भारतीय नागरिकांना आहे. मात्र हे पैसे नेमके कोणत्या माध्यमातून आले यासंदर्भातील सविस्तर माहितीबद्दल तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली तर त्याची उत्तरं संबंधितांनी देणं आणि त्यासंदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ तपास यंत्रणांना एखाद्या घरामध्ये छापेमारीदरम्यान एक कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. अशावेळी ही रक्कम कुठून आली किंवा या रक्कमेच्या कमाईचा स्त्रोत काय हे संबंधित व्यक्तींनी तपास यंत्रणांना सांगणं बंधनकारक असतं. जर या पैशांसंदर्भातील पुरावे आणि योग्य माहिती देता आली नाही किंवा ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर प्रकरणाच्या तपासात व्यक्ती दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला एकूण रक्कमेच्या १३७ टक्क्यांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.आयकर विभागाच्या नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये नेमकं किती सोनं ठेवता येतं याबद्दल जाणून घेऊयात. या नियमांनुसार लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या महिलांसाठी तसेच पुरुषांसाठीही वेगवगेळे प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *