किराणा विव्रेâता संघाचा पुढाकार

अकोला

शहरात सर्वत्र फडणार राष्ट्रीय ध्वज
इब्राहिम घाणीवाला यांचा पुढाकार


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त किराणा खाद्य विक्रेता संघाच्या वतीने मुर्तीजापुर शहरात तिरंगा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शहरातील प्रत्येक किराणा व खाद्य दुकानदारांना तिरंगा वितरित करण्यात आला.


देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव निमित्त किराणा, खाद्य विव्रेâता संघाच्या वतीने मूर्तिजापूर शहरात तिरंगा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील प्रत्येक दूकानावर तिरंगा स्टेशन चौक ते जुन्या वस्तीत वितरीत करण्यात आला. किराणा खाद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष इब्राहिम घाणीवाला यांनी या विषयी पुढाकार घेतला. विजय हुदांनी, अनिल चटरेजा, भूषण सोमानी, मनोहर निमोनिया, अर्पित अग्रवाल इत्यादी या उपक्रमात सहभागी होते. प्रत्येकाने हर घर तिरंगा मोहिमेत सहभाग घेऊन दुकानदारांनी आपल्या दुकानावर तिरंगा लावून तिरंग्याचा सन्मान वाढवावा, असे आवाहन किराणा खाद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष इब्राहिम घाणीवाला यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *