वाशिम शहरात मुस्लिम बाँधवानी काढली तिरंगा रॅली !

वाशिम

-वाशिम-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाशिम येथे मुस्लिम बाँधवांच्या वतीने घर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत शहरात मोटरसायकल रँली काढण्यात आली. या रॅली मध्ये मोठ्या संख्येन मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाशिम येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने आज शुक्रवार च्या नमाज नंतर मोटरसायकिल रॅली काढून घर घर तिरंगा या मोहिमेची जनजागृती करण्यात आली.या रॅलीची सुरवात वाशिम शहरातील दिघेवाडी चौक येथून सुरवात झाली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,पाटणी चौक,शिवाजी महाराज चौक ,नगीना मस्जिद चौक , सौदागर पूरा ते परत दिघेवाडी चौक येथे सांगता करण्यात आली .या रॅली मध्ये मौलाना ,मुफ़्ती यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बाँधवांनी आपला सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *