मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठी अविरत लढा देणारे विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. मुंबई त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी अंत्यदर्शनासाठी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे वकील गुणरत्न सदरवर्ते देखील आले होते. मात्र यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांनी त्यांना सुरक्षीत बाहेर काढलं. आता यावर सदावर्ते यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे.सदावर्ते म्हणाले की, आम्ही मेटे यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना येणार असल्याचं सांगितलं होतं. आम्ही यावेळी प्रार्थना केली. इतर आमदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, अशा प्रकराचा हल्ला माझ्यावर करण्यात आला. त्यांनंतर पोलिसांनी मला रेस्क्यू करून बाहेर काढल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. शरद पवार आणि ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी ते लोक तरुणांना हाताशी धरून अशा प्रकारचे वर्तन करायला लावतात. सर्वच मराठा तरुण यात आहेत, अस मी म्हणत नसल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं.