शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती माzzर्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. या सर्व घडामोडीनंतर विनायक मेटे यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
अपघाताची घटना घडल्यानंतर नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि वैद्यकीय टर्मीनोलॉजीच्या आधारे त्यांनी विनायक मेटेंच्या निधनाबाबत संशय व्यक्त केला आहे. ज्योती मेटे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली, तेव्हा मी अक्षरश: धावत सुटले. मी विश्वास नांगरे पाटलांना फोन केला, माझा भाऊदेखील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहे, मी त्यालाही फोन केला. पण8 दोघांनीही कॉल उचलला नाही.”